Kusum solar pump scheme व महावितरणच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना मिळणार २ लक्ष सौर कृषी पंप जाणून घ्या संपूर्ण माहिती.
वीज भारनियमन टाळण्यासाठी आणि शेतीला वेळेत पाणी देण्यासाठी राज्यातील अनेक शेतकरी बांधवानी कुसुम सौर कृषी पंप अर्थात Kusum solar pump scheme योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केले होते.
Kusum solar pump scheme संदर्भात बैठक
या सर्व बाबींना शेतकरी कंटाळलेले आहेत आणि अशातच म्हणजेच दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाउर्जा मंडळाची बैठक घेवून काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत जे कि शेतकरी हिताचे आहेत.
राज्यात kusum solar pump scheme व महावितरणच्या माध्यमातून 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने सुरु केलेली कुसुम सौर पंप योजना अंतर्गत 1 लक्ष सौर पंप मेडातर्फे तर महावितरणच्या माध्यमातून 1 लक्ष सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण पेड पेंडिंग पूर्ण करण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.
भविष्यामध्ये 4 हजार मेगावॅटचे फिडर सौर उर्जेवर आणण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार आहे तसेच सबसिडीचा भारसुद्धा कमी होणार आहे.
अधिकृत माहितीसाठी खलील लिंकवर क्लिक करा.